logo

वाहनांची घंटागाडी धडक चालक-जखमी

साबीर मोहम्मद AIMA न्यूज बुलढाणा महाराष्ट्र
बुलढाणा. नांदुरा 2 मे भरधाव वेगातील वाहनाने घंटा गाडीला धडक दिल्याने चालक जखमी झाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर एक मे रोजी सकाळी नऊ वाजता हा अपघात घडला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 बाजूला दहिगाव शिवारात नगरपरिषदेचे कचरा डम्पिंग हाऊस आहे घंटागाड्या कचरा जमा करून या ठिकाणी रिकाम्या करतात घंटागाडी वाहन क्रमांक एम एच २८ बीए 0894 कचरा घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात घंटागाडी चालक समाधान सुधाकर निकम जखमी झाला त्याचा सहकारी गौरव गौतम जाधव किरकोळ जखमी झाला न, प , अभियंता नीरज नाफडे यांच्याशी संपर्क केला असता अद्याप पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याचे सांगितले

81
625 views